बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“असंच चालत राहिल्यास नोटेवरुन गांधीचा फोटो हटवून मोदी स्वत:चाच फोटो छापतील”

मुंबई | पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर आणि विमानतळांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो बघायला मिळतो. फोटो छापण्याच्या स्पर्धेत मोदी फारच पुढे निघून गेल्याचं यावरुन समजतं. विशेष म्हणजे खादीच्या कॅलेंडरवरही महात्मा गांधींच्या ऐवजी मोदींचाच फोटो छापण्यात आला होता. हे सारं काही असंच चालत राहिल्यास नोटेवरुन गांधीचा फोटो हटवून मोदी स्वत:चाच फोटो छापतील, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

बंगालच्या लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो झापण्यात आल्यानं वादंग निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसनंही या घटनेचा तिव्र शब्दात निषेध केलाय. या घटनेचाच हवाला देत मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. बंगालमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांवर डोळा ठेवूनच सरकारनं असा प्रकार केल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे.

निवडणूक आयोगानंही याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. बंगालमधील निवडणूकीमुळे वातावरण तंग झालेलं असताना लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींच्या फोटो प्रकरणावर विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. निवडणूक आयोग आता या प्रकरणी काय कारवाई  करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान मागील काही दिवसांआधीच निवडणूक आयोगानं निवडणूका जाहिर केलेल्या राज्यातील पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असलेले सर्व होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते.  या निर्णयानंतर आता लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटो काढण्याचे नवे आदेशही आरोग्य मंत्रालयाला देण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

…म्हणून मी स्टंपच्या मागे मोठ्याने बडबड करतो, पंतने केला खुलासा, पाहा व्हिडीओ

‘कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला…’; चंद्रकांत पाटलांची महाविकासआघाडीवर सडकून टीका

चांगली खेळी करुनही पदरी निराशा, ‘सुंदर’चं शतक थोडक्यात हुकलं

केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोदी सरकारला पुन्हा दणका; दिले ‘हे’ आदेश

स्वॅब न देताच रुग्णाला दिला कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More