बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमच्या सरकारमध्ये मोबाईल वाजला तर शेतकऱ्यांना वाटायचं मदत आली”

बीड | मराठवाड्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. तर काही भागात ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील जायकवाडी सोडता सर्वच धरणातून नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मराठवाड्यात कधी नव्हे ते इतका प्रमाणाबाहेर झालेल्या पाऊसाने शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे.

भाजप नेत्या आणि बीडच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे सध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. परळी तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी पंकजा मुंडेंनी केली आहे. पिकाच्या नुकसान भरपाईसह जमीनदोस्त झालेल्या पिकांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुंडेंनी केली आहे.

बीड जिल्ह्यात मोबाईल वाजला तर मदत आली असं शेतकऱ्यांना वाटायचं. पण या सरकारमध्ये कसलीच मदत नाही. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याचा बीड दौरा झाला मात्र त्यांनी एकाही शेतकऱ्याच्या बांधावर जात शेतकऱ्यांना धीर दिला नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सध्या बीड जिल्ह्यात परिसंवाद यात्रेनिमित्त दौऱ्यावर आहेत. यावरून पंकजा मुंडेंनी पाटील यांच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, काल परळीत पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्याच्या पाच संचालकांनी पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. कोणी राष्ट्रवादीत गेल्याने मला धक्का नाही, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी. तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, अस देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या –

#Breaking पंजाब काँग्रेसला मोठा धक्का! नवज्योतसिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

मराठवाड्यात पावसाचं थैमान! 35 जणांचा मृत्यू तर 20 लाख हेक्टर शेतीचं नुकसान

“मुश्रीफांना तुरूंगात धाडणार, आजपासून ठाकरे सरकारच्या अंताला सुरूवात”

धक्कादायक! 2021च्या सुरुवातीला लस घेतली त्यांना कोरोनाचा धोका अधिक

युती नाही पण समझोता! आगामी निवडणुकांसाठी भाजप-मनसेचं गणित ठरलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More