खेळ

पॉवर-प्लेमध्ये हैदराबादच्या वॉर्नर आणि साहाने दिल्लीकरांना दणका देत केला मोठा पराक्रम

मुंबई | आयपीएलमधील चालू असलेल्या हैदराबाद आणि दिल्लीमधील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने जोरदार फटकेबाजी करत मोठा पराक्रम आपल्या नावे केला आहे. यामध्ये सुरूवातील फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यांनी बहारदार खेळी केली.

वॉर्नर आणि साहा यांनी दिल्लीच्या गोलंदाजीताल पिसे काढत पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 6 षटकांमध्ये 77 धावा काढल्या. यामध्ये आज बेयस्टोच्या जागी संधी मिळालेल्या साहाने आपली निवड सार्थ ठरवत आक्रमक फलंदाजीचा पवित्रा घेतला.

दोघांनी मिळून 77 धावा केल्याच त्यासोबतच कर्णधार डेव्हिड वॉर्नरने पॉवर-प्लेमध्ये आपलं अर्धशतक पुर्ण केलं. यंदाच्या हंगामात पॉवर-प्लेच्या षटकांमध्ये अर्धशतक ठोकणारा वॉर्नर पहिलाच खेळाडू ठरला आहे तर बिनबाद 77 धावा ठोकणारा संघही हैदराबादचा ठरला आहे.

दरम्यान, दिल्लीला हैदराबादने 220 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीचा हुकमी गोलंदाज कगिसो रबाडालाच 50 च्या वर धावा काढल्या. त्यामुळे इतर गोलंदाजांनाही आपली छाप पाडता आली नाही.

 

 

महत्वाच्या बातम्या-

कमल नाथ, दिग्विजय सिंह हे प्रदेशमधील मोठे सर्वात मोठे गद्दार- ज्योतिरादित्य शिंदे

“ब्राह्मणांना भाजपशिवाय पर्यायच नाही, इतर ठिकाणी त्यांना सन्मान मिळत नाही’; भाजप नेत्याचं वक्तव्य

‘पराभव साजरा करायलाही नशीब लागतं’; धनुभाऊंना पंकजाताईंकडून प्रत्युत्तर!

जम्मू-काश्मिरमध्ये जमीन खरेदी करता येणार मात्र अद्यापही ‘या’ जमिनी खरेदी करता येणार नाहीत!

दसरा मेळाव्याचं भाषण होतं की शिमग्याचं- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या