Top News देश

आयटी कंपन्यांना तब्बल इतक्या दिवसांपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’; केंद्र सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली | आयटी आणि बीपीओ कंपन्यांनी कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम‘ करण्यास 31 जुलैपर्यंत सूट द्यावी, अशा सूचना केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्या. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर होण्याच्या आधीपासूनच आयटी कर्मचारी घरुन काम करत आहेत.

कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेक कंपन्या चीनपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन भांडवल निर्माण करण्याची संधी असल्याचंही रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. प्रत्येक राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांसह झालेल्या ऑनलाईन बैठकीनंतर ते बोलत होते.

लॉकडाऊनमध्ये सूट मिळाली, तर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू नये, यासाठी रविशंकर प्रसाद यांनी घोषणा केली आहे. इंटरनेटचा वेग कायम ठेवण्यासाठी ‘भारतनेट’ची मदत घेणार असल्याचंही प्रसाद यांनी सांगितलं आहे.

सध्या एप्रिल अखेरपर्यंत कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या पर्यायाला परवानगी होती. दूरसंचार विभागाने यापूर्वी ही सवलत एक महिन्यापर्यंत वाढवली होती, परंतु प्रसाद यांनी 31 जुलैपर्यंत ही सवलत लागू असल्याचं स्पष्ट केलं. आतापर्यंत जवळपास गेला दीड महिना देशभरातील अनेक आयटी कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत.

 

ट्रेंडिंग बातम्या-

अमेरिकेने भारताला सीरियासारखी वागणूक दिली, मोदी ट्रम्प गळाभेट व्यर्थ गेली- असदुद्दीन औवेसी

ठाकरे सरकारने आतातरी भानावर यावं- विखे पाटील

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनाविरुद्ध लढाईत फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात”

धक्कादायक! पुण्यात आज सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चिंताजनक

कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले; कुटुंबियांना मोठा दिलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या