मुंबई | भारतातील दूरसंचार उद्योगातील दिग्गज कंपनी मानल्या जाणाऱ्या रिलायन्स जियोने ग्राहकांना नव्या वर्षाचं मोठं गिफ्ट दिलं आहे. जिओ कंपनीने 1 जानेवारीपासून देशात सर्व नेटवर्कसाठी पुन्हा एकदा कॉलिंग सेवा विनामूल्य केली आहे.
जिओ ग्राहकांना आता 1 जानेवारीपासून कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंग करता येणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार, देशात 1 जानेवारी 2021 पासून बिल अँड कीप नियम लागू होणार आहे. त्यामुळे आययुसी चार्ज संपणार आहे.
सप्टेंबर 2019 मध्ये आययुसी चार्ज आकारायला सुरूवात केल्यानंतर जिओने ज्यावेळी ट्राय आययुसी चार्ज संपवेल तेव्हा आम्हीही युजर्सकडून आययुसी चार्ज आकारणार नाही असं सांगितलं होतं.
दरम्यान, सध्या जिओकडून दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी IUC चार्ज आकारला जातो. यासाठी जिओ दर मिनिटाला 14 पैसे आकारत होती नंतर 7 पैसे आकारले जात होते. मात्र आता 1 जानेवारी 2021 पासून असा कोणताही चार्ज घेतला जाणार नाही.
All calls from Jio to other networks in India to be free from Jan 1, 2021 as Interconnect Usage Charge (IUC) regime ends: Statement
— Press Trust of India (@PTI_News) December 31, 2020
थोडक्यात बातम्या-
क्रेटाला टक्कर देण्यासाठी MG सज्ज; येतेय ही जबरदस्त कार, पाहा लूक आणि फिचर्स
पती दिल्लीला; बॉयफ्रेंडलाही आला अनैतिक संबंधाचा संशय, घडला धक्कादायक प्रकार
सरकार कुणाचंही असलं तरी बाटली जुनी आणि पाणी नवं, एल्गार परिषद होणारच- बी. जी. कोळसे पाटील
वाहनचालकांना मोठा दिलासा; फास्टटॅग लावण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदवाढ
2020 पेक्षा 2021 जास्त धोकादायक असेल?; WHOनं दिला ‘हा’ मोठा इशारा