Top News महाराष्ट्र मुंबई

…म्हणून आव्हाड म्हणत आहेत की ठाकरे सरकारविरूद्धही आंदोलन करा

मुंबई | केंद्र सरकारवर टीका केलीच पाहिजे त्यासोबतच राज्यात आपली जरी सत्ता असली तरी राज्य सरकारचे काही निर्णय चुकत असतील तर आपण आंदोलन केलं पाहिजे, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला त्यावेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळी आव्हाडांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंवर लागलेल्या ईडी चौकशीबाबतही वक्तव्य केलं आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळेच त्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. इतकी वर्ष चौकशी लागली नाही आणि आता अचानक कशी काय लागली? याचा अर्थ सहाजिक आहे की, यामागे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश हे एकच कारण असल्याचंही आव्हाडांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 30 डिसेंबर 2020 रोजी हजर राहण्यासंदर्भात ईडीचं समन्स मला मिळालं असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

थोडक्यात  बातम्या-

ईडीवरून सीडी लावण्याच्या खडसेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले…

भाजपला धक्का! एनडीएतून आणखी एक मित्रपक्ष बाहेर

३१ डिसेंबरला संचारबंदीची अट शिथिल करा; मनसेची मागणी

‘शरद पवारांनंतर तुमचं काय स्थान राहील’; पाटलांचा अजित पवारांना सवाल

“सत्ता कोणाच्या बापाच्या मालकीची नसते, जोपर्यंत भाजपची जिरवत नाही तोपर्यंत आम्ही तिघे एकत्र”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या