Top News खेळ

“भारतीयांनो खरा संघ येतोय तुम्हाला तुमच्याच घरात पराभूत करायला, सतर्क रहा”

मुंबई | भारतीय संघाने बोर्डर-गावसकर कसोटी सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 पराभव केला. त्यासोबतच गाबाच्या मैदानावर अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रलियालाचा विजय रथ रोखला. त्यामुळे भारतीय संघाचं कौतूक होत आहे आणि खेळाडूही विजय साजरा करत आहेत. अशातच भारताला इंग्लंडच्या माजी खेळाडूने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यात क्रिकेट मालिकेला सुरूवात होत आहे. इंग्लंड संघ भारतात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने भारताला डिवचलं आहे.

भारतीय संघाने या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करावा. कारण हा विजय सर्व अडचणीवर मात करून मिळाला आहे. मात्र खरा संघ काही आठवड्यानंतर येत आहे तुम्हाला तुमच्या घरात पराभूत करण्यासाठी, सतर्क रहा, असं केविन पीटरसनने म्हटलं आहे.

दरम्यान, दोन आठवड्यात जास्त जल्लोष करण्यापासून सावध रहा, असंही पीटरसनने म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘माझे वीजबिल, मलाच झटका…; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची सरकारवर टीका

गांजाचा वापर करुन कोरोना रुग्णांना वाचवता येऊ शकतं; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी, कधी?’, शिवसेनेचा मोदींना सवाल

“पुरोगामी शरद पवार तुमच्या पक्षाचे महिला धोरण धनंजय मुंडेना पाठीशी घालणारे असेल पण…”

‘सोलापूर, सांगली आमच्याकडे घेऊ’; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्राला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या