बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?”

मुंबई | ठाणे पोलिसांनी श्रीमती अनंत करमुसे यांना पोलिस स्टेशन येथे आरोपी म्हणून बोलावलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कोणतीही कारवाई नाही पण करमुसे कुटुंबीयांवर पोलिसांच्या माध्यमातून दबाव? आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आणि मुख्यमंत्री गप्प का, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यातील एका तरुणाने त्याला गंभीर मारहाण केल्याचा आरोप केला होता. आव्हाडांच्या अंगरक्षकांनी आणि 10- 12 जणांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप त्याने केला होता. यावरून भाजपने आव्हाडांवर टीकेची झोड उडवली होती.

अनंत करमुसे अभियंता गेल्या तीन वर्षांपासून माझ्या विरोधात नको त्या पोस्ट करत होता. संबंधित अभियंत्याच्या फेसबुकवर गेलं तर लगेच समजेल की तो संघ आणि भाजप विचारांचा आहे. तो वारंवार वादग्रस्त पोस्ट लिहीत असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं होतं

दरम्यान, अनंत करमुसे प्रकरण कुठेतरी थांबल असं वाटत असताान आता सोमय्या यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधत  शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले इतके कोटी रुपये

कुठलीही महाविद्यालयीन परीक्षा रद्द होणार नाही, परीक्षा होणारच- उच्च-तंत्रशिक्षण मंत्री

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय

मुस्लिमांच्या बदनामीचा प्रयत्न होत आहे- ओवैसी

कोरोनाच्या लढ्यात सुनिल गावसकरांकडून 59 लाख रूपये पण मदतीचा गवगवा नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More