बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”

मुंबई | प्रसिद्ध स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा हा नेहमी वेगवेगळ्या मुद्यांवरून सोशल मीडियावर चर्चेच असतात. त्याच्या भाजपविरोधी वक्तव्यामुळे तो नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना तो नेहमी निशाण्यावर घेत त्याच्यांची थट्टा करत असताना दिसतो. तर आता त्याने ट्वीट करत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केलं आहे.

त्या मृत्युनंतर नेमकं काय घडलं याबद्दल मी निश्चित नाही. या प्रकरणात पुढे काय होईल याची देखील मला खात्री नाही. तर उद्या या प्रकरणात काय समोर येईल सांगू शकत नाही. पण देवेंद्र फडणवीस पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत याची मला पुर्ण खात्री आहे, असं ट्विट कुणास कामरा याने केलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात विरोधी पक्ष भलताच आक्रमक होताना दिसत आहे. संजय राठोड यांच्या प्रकरणात भाजपने सेनेची गळचेपी केली होती, तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध झालेल्या भष्ट्राचाराच्या आरोपावरून राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे. तर फडणवीस यांनी डेटा बाॅम्बच्या प्रकरणावरून सरकारची गोची केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचे मंत्री फडणवीसांना लक्ष्य करून टीका करत आहेत.

दरम्यान, कुणाल कामरांसारखे अनेक काॅमेडियन राजकीय मुद्यांवरून भाष्य करताना दिसत आहेत. कुणाल कामराच्या एका ट्विटमुळे मध्यंतरी मोठा खळबळ उडाली होती. न्यायालयावर केलेल्या आक्षेपार्य ट्विटमुळे न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला होता.

पाहा ट्विट –

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रवासियांनो सावध व्हा! देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेली 10 पैकी ‘ही’ 9 शहरं महाराष्ट्रातील!

“एका व्यक्तीनं जरी त्रास दिल्याचं दाखवून दिलं तर उमेदवारी अर्ज भरणार नाही”

संजय राऊतांच्या घरी मेजवानी, भाजप नेत्यांनाही जेवणाचं निमंत्रण!

…म्हणून आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात आता फक्त ‘TATA SAFARI’च दिसणार!

बीचवरील हाॅट आणि बोल्ड अंदाजातील फोटोंमुळे पुजा बात्रा पुन्हा एकदा चर्चेत, पाहा फोटो!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More