बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिला कोणीतरी साडी नेसायला द्या, मल्लिका शेरावत झाली ट्रोल

मुंबई | बाॅलिवूड कलाकरांचे कपडे काहींना प्रचंड पसंतीस येतात नाहीतर ट्रोलिंगचा विषय बनतात. अशातच बाॅलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत आपल्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली आहे.

मल्लिका अनेक दिवसांपासून बाॅलिवूडपासून दूर होती. काही दिवसांपुर्वीच ती परदेशातून मायदेशी परतली असून आता ती पुन्हा बाॅलिवूडमध्ये दिसणार आहे. यादरम्यान ती लवकरच एका काॅमेडी शोची परीक्षक म्हणून दिसणार आहे.

काॅमेडी शोच्या स्टेजवर जाताना मल्लिकाने वेगळ्या प्रकारचा ड्रेस परिधान केला आहे. यावेळी व्हॅनेटीमधून उतरत असतानाचा एक व्हिडीओ विरल भैयानीने शेअर केला आहे. यानंतर तो नक्की ड्रेस आहे की साडी हे ओळखणं लोकांना कठिण जात आहे. अशातच तिच्या ड्रेसवरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, मल्लिकाच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत तिला कोणीतरी साडी नेसायला द्या अशी कमेंट केली आहे. तर एकाने साडी सारख्या सुंदर वस्त्राला देखील फॅशनच्या नावाखाली खराब केलं जात असल्याची कमेंट नेटकऱ्याने केली आहे.

पाहा व्हिडीओः

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

 

 

थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीसांचा राकेश टिकैत यांच्यावर निशाणा, म्हणाले…; पाहा व्हिडीओ

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल

“ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या”

विजय वडेट्टीवारांचा संभाजीराजेंवर अप्रत्यक्ष निशाणा, म्हणाले…; पाहा व्हिडीओ

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: जॅकलीनच्या चौकशीत धक्कादायक गोष्टींचा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More