बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज!”

लखनऊ | उत्तर प्रदेशचे मंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज असल्याचं म्हटलं. आहे. शुक्ला यांनी गुरुवारी पत्रकार परिषेद घेतली होती. यावेळी त्यांनी अनेक वक्तव्य केली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याची विचारधारा संपवून टाकली आहे, असं वक्तव्य आनंद शुक्ला यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं आहे. तसेच यावेळी भगवान श्रीकृष्ण, श्रीराम आणि महादेव हे मुसलमानांंचे पूर्वज असल्यानं मुस्लिमांनी मक्का मदीनाला जाण्याची गरज नसल्याचं देखील शुक्लांनी म्हटलं आहे.

मुसलमानांनी भारताची भूमी आणि संस्कृती समोर नतमस्तक व्हावे, असं वक्तव्य आनंद शुक्लांनी केलं आहे. तसेच आफगाणिस्तान आणि सिरीयासह अनेक देशांमधील लोकांनी संपूर्ण जगाला मुस्लीम बनवण्याची इच्छा बाळगली होती. यामध्ये भारतातील काही लोकांचा देखील समावेश आहे. मात्र मोदी आणि योगी केंद्र आणि राज्य सरकारने जगभर हिंदुत्वाचा झेंडा फडकवून ही विचारधारा संपवली असल्याचं शुक्लांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांनी समाजवादी पक्ष समर्थन देत आहे. समाजवादी पक्षाचे खासदार खुल्लमखुल्ला तालिबानांचे समर्थन करत असल्याचं म्हणत आनंद शुक्ला यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या- 

गर्लफ्रेंडचा राग बाॅयफ्रेंडच्या जीवावर बेतला, रागात फेकून मारला फोन अन्…

एकरकमी FRP साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे डिजिटल आंदोलन

“महाराष्ट्रात काॅंग्रेसला पुन्हा एक नंबरचा पक्ष बनवणार”

शेतकऱ्यांना आता 6000 ऐवजी मिळवता येणार पूर्ण 36 हजार रुपये, वाचा सविस्तर

“महिलांवर अत्याचार व्हावेत असं रावणालाही वाटत नसेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More