महाराष्ट्र मुंबई

मी जाहीर करतो की आजपासून मी भाजप-आरएसएस सोबत आहे- मदन शर्मा

मुंबई | मुंबईतील माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना  शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली होती. मदन शर्मा यांनी या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या नंतर मदन शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मी आतापासून भाजप-आरएसएस सोबत आहे, असं मदन शर्मा म्हणाले.

आतापासून मी भाजप-आरएसएस सोबत आहे. जेव्हा मला मारहाण झाली, तेव्हा त्यांनी मी भाजप-आरएसएस सोबत असल्याचे माझ्यावर आरोप केले होते. तर आता मीच हे जाहीर करतो की, आतापासून मी भाजप-आरएसएस सोबत आहे, असं मदन शर्मा म्हणाले.

राज्यपालांकडे आपण राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असल्याचं मदन शर्मा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मारहाण केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. आज या सगळ्यांना कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

आग्र्यातल्या याच दरबारातील अपमानाचा बदला घेवून महाराजांनी…’; उदयनराजेंनी मानले आदित्यनाथ यांचे आभार

ड्रग माफियांची माहिती न देताच ड्रामा क्वीन का परत गेली?”

विधी’च्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं पुनर्विलोकन करा- सुनील गव्हाणे

अचानक अभिषेक फासावर लटकल्याचा दिसला तर…’; कंगणा राणावतचं जया बच्चन यांना प्रत्युत्तरव्या

पाऱ्याला मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या