Top News औरंगाबाद महाराष्ट्र

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा डंका, सतीश चव्हाणांची हॅट्रीक

औरंगाबाद | औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलद दोनवेळा विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवत हॅट्रीक साधली आहे.  भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

सतीश चव्हाण यांना तब्बल 1,16,638 मते मिळाली आहेत.  तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना 58,743 इतकी मते मिळाली आहेत. त्यामुळे 57,895 मताधिक्क्यानं सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून हाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरीष बोराळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये सतीश चव्हाणांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

दरम्यान,  मागील निवडणुकीतसुद्धा भाजपतर्फे शिरीष बोराळकर हे उमेदवार होते. त्यावेळीसुद्धा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढवत होती त्यामुळे ही निवडणुक अटीतटीची मानली जात होती. मात्र चव्हाणांना एक लाखांपेक्षा जास्त मतदान झालं.

महत्वाच्या बातम्या-

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपला धक्का; महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी

‘कांदळवन जमिनीवरील हरकती-दाव्यांची चौकशी तातडीने पूर्ण करा’; आदित्य ठाकरेंचे आदेश

अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा- अर्णब गोस्वामी

‘आमचे लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना?’; सोनिया गांधींच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले…

“…तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या