बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओव्हर एक्टिंगचे 50 कट! लस घेताना केलेल्या ड्रामामुळे मराठी अभिनेत्री झाली ट्रोल

मुंबई | भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला. 1 मेपासून देशातील राज्यांमध्ये लसीकरण चालू झालं आहे. इंजेक्शनद्वारे लस दिली जाते. मात्र काहींना अजूनही इंजेक्शनची भीती वाटते, त्यामुळे लस घेताना काहीजण खूप घाबरलेले दिसतात किंवा डॉक्टरांना त्रास देतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशाच प्रकारे मराठी अभिनेत्री हिना पांचाळनेही लस घेताना केेलेल्या ड्रामामुळे सोशल माध्यमांवर ती ट्रोल झाली आहे.

जेव्हा डॉक्टर तिला कोरोनाची लस देतात तेव्हा ती घाबरलेली दिसत आहे. कदाचित लहान मुलंही आता इतकं इंजेक्शन घेताना घाबरत नसलतील. मात्र हिनाच्या या ड्रामामुळे सोशल मीडियावर ती ट्रोल झालेली पाहायला मिळत आहे.

सर्वसामान्यांना लस मिळत नाही, लसीसाठी ते कितीतरी वेळ लाईनमध्ये थांबतात तरीही त्यांना लस मिळत नाही. लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे अजुनही भरपूरजणांना कोरोना लस मिळलेली नाही. सेलिब्रेटींनी ही लस मिळत आहे तर त्यांचा ड्रामा पाहायला मिळत आहे. हिनाने लस घेतानाचा व्हिडीओ आपल्या इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

‘ओव्हर अ‍ॅक्टिंग की दुकान” , ”ओव्हर एक्टिंगचे 50 रु. कट, अशा कमेंट्स हिनाच्या पोस्टवर आल्या आहेत. याआधी अभिनेत्री अंकिता लोखंडेचाही लस घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सेलिब्रेटींच्या अशा वागण्यावर अनेक कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by HEENNAA PANCHAAL (@theofficialheena)

थोडक्यात बातम्या-  

सकारात्मक बातमी | कॅन्सरग्रस्त 3 वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, रुग्णालयात जल्लोष, पाहा व्हिडीओ

मराठा समाजासाठी 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा- चंद्रकांत पाटील

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! सरपंच राहिलेल्या महिलेला कोणी खांदा न दिल्याने मुलाने….

चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे- अशोक चव्हाण

पुण्यातील भाजी विक्रेत्या आजीनं कोरोनाग्रस्तांना केली 1 लाखाची मदत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More