सिडनी | पहिला टी-20 सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी आजचा दुसरा सामना ‘करो या मरो’ची लढाई आहे. दरम्यान या सामन्यात एक नाट्यमय प्रकार घडलेला दिसला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया कर्णधार मॅथ्यू वेडचा कॅच सोडला खरा मात्र तरीही वेड बाद झाला.
सुंदरच्या गोलंदाजीवर विराट कोहलीकडून वेडचा अगदी सोपा झेल सुटला. झेल सुटताच ऑस्ट्रेलियन चाहत्यांना आनंद झाला मात्र हा आनंद अगदी क्षणार्धात विरला. कारण नेमकं त्याचवेळी कोहलीने बॉल विकेटकीपरकडे फेकत वेडला रन आऊट केलंय.
Uh-oh 🙆♂️ #AUSvINDpic.twitter.com/axltbEVLjm
— ICC (@ICC) December 6, 2020
मॅथ्यू वेड कॅच पकडण्याच्या नादात बॉल कोहलीच्या हातून 3 वेळा सुटला. यावेळी फलंदाजी करताना मॅथ्यू वेड आणि स्मिथमध्ये गोंधळ झाला. धाव काढायची की नाही या गोंधळात वेड धाव काढण्यासाठी उशीरा धावला. मात्र तोवर कोहलीने के.एल राहुलकडे बॉल फेकत वेडला रनआऊट देखील केलं.
कर्णधान आरोन फिंचच्या अनुपस्थितीत वेडने चांगली फलंदाजी केली. 32 बॉलमध्ये त्याने 58 धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा, म्हणाले…
रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज गेला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ईडीकडून प्रताप सरनाईकांना तिसऱ्यांदा समन्स; 10 डिसेंबरला हजर राहण्याची सूचना
जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड
मुंबईतील लालबाग परिसरात सिलेंडरचा स्फोट; 16 जण जखमी