बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मिथुन चक्रवर्ती अखेर ‘भाजप’च्या वाटेवर; कोलकाताच्या रॅलीत केला पक्षप्रवेश…

कोलकाता | बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना अनेक दिवसांपासून उधाण आलं होतं. आज अखेर चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोलकत्याच्या ब्रिगेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा फडकावत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी याआधी 2014 मध्ये तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेची खासदारकी मिळवली होती.

मुंबईत 16 फेब्रुवारी रोजी मिथुन यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या दिवसापासूनच मिथुन भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशा चर्चा देशभर सुरु होत्या. विधानसभा निवडणूका ऐन रंगात आलेल्या असताना मिथुन चक्रवर्ती यांचा भाजप प्रवेश तृणमूल काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला असल्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकींचं बिगुल वाजलं असून २७ मार्चसून मतदानाला सुरवात होणार आहे. तृणमूल काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपकडून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. ब्रिगेड मैदानावरून त्यांनी ममता बॅनर्जी यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. बंगालच्या जनतेनं ममता बॅनर्जींवर विश्वास ठेवला खरा मात्र त्यांच्याकडूनच जनतेचा विश्वासघात करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलंं.

दरम्यान बंगालमध्ये २९४ जागांसाठी विधानसभा मतदान २७ मार्चपासून पार पडणार आहे. ८ टप्प्यांमध्ये असलेल्या या निवडणूकीचा  निकाल २ मे रोजी जाहिर करण्यात येेणार आहे. ब्रिगेड मैदानावर आज पार पडलेल्या भाजपच्या रॅलीमध्ये जवळपास १० लाख लोक सहभागी झाले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘राज ठाकरेंच्या ‘त्या’ आवाहनामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला’, पोलिसात तक्रार दाखल

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परदेशात जायला वेळ पण…’; शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र

मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा म्हणाले; ‘माता, माती आणि माणूसकी…’

काय सांगता! खेकडा चक्क सिगरेट ओढतोय; ‘हा’ व्हिडीओ पाहून सारं जग झालंय थक्क

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात नियमांना धाब्यावर बसवुन चित्रपटाचं शूटिंग; मनसेचे गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More