बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार अरुण लाड यांनी विधानपरिषदेत पदवीधारकांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी राज्यातील पदवीधारकांसाठी मोठी मागणी विधानपरिषदेत केली आहे. अनुदानीत शाळा संपण्याच्या मार्गावर आहेत. शाळा टिकविण्यासाठी शिक्षक भरती करून प्रत्येक तुकडीसाठी शिक्षक नेमणं गरजेचं आहे. म्हणून राज्यातील पदवीधारकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करुन नोकरभरतीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी लाड यांनी बैठकीदरम्यान केली आहे.

विधानपरिषदेत बोलताना लाड म्हणाले की, सामान्य नागरिकांसाठी शिक्षण टिकवणं हे सरकारचं महत्वाचं काम आहे. शिक्षणाचचं खासगीकरण झाल्यास नागरिकांना शिक्षणापासून वंंचित रहावं लागेल. शासकीय कार्यालयातील पदं रिक्त असल्यानं कामकाजात अडथळा येत आहे. या रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडून पडली आहे. आरोग्य विभागातील अत्यावश्यक पदांची भरती शासनानं त्वरित करावी असं मतही लाड यांनी यावेळेस व्यक्त केलं.

एम्प्लोयमेंट एक्सेंज विभागात सुरु असलेल्या अनागोंदी कारभारावरकडेही लाड यांनी लक्ष वेधून घेत या विभागावरील पदवीधरांचा विश्वास उडाल्याचं सांगितलं. यासोबतच शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमीभाव देण्याविषयी मत मांडतानाच  बँका बुडविल्या त्यांना लाखोची मदत केली जाते मात्र शेतकऱ्याला केवळ तुटपुंजी मदत केली जाते असं मतही त्यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केलं आहे.

दरम्यान अरुण लाड पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतरच्या पहिल्याच विधानपरिषदेत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच पदवीधरांच्या अनेक मागण्याही बैठकीसमोर ठेवल्या. पदवीधारकांसाठी स्वतंत्र महामंडळाची महत्वाची मागणीही त्यांनी यावेळेस केली आहे.

थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचं म्हणणाऱ्याला अटक

मास्क का वापरायचा नाही याचं ठोस कारण राज ठाकरेंनी सांगावं- संजय राऊत

शाळेत जाण्यासाठी आईने केली बळजबरी, मुलाने केली पालकांचीच हत्या

धक्कादायक! अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं असलेल्या कारमालकाचा संशयास्पद मृत्यू

धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली – पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More