बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदीजी आम्ही देशासाठी बलिदान देण्यास तयार आहोत” पाहा चिमुरड्यांच्या हा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ खुपच धक्कादायक असतात. अशातच देन चिमुरड्यांच्या व्हिडीओनी सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. देशासाठी आम्ही बलिदान देयला तयार असल्याचं या बालकांनी या व्हिडीओमध्ये म्हणलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा, काॅलेज बंद आहेत. यावरुनच हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये या मुलांनी पंतप्रधान मोदींसोठी एक संदेश दिला आहे. यामध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या शिक्षणाचं बलिदान देण्यास तयार आहोत, असं ही दोन मुलं म्हणत आहेत.

कोरोनामुळे सर्व अभ्यास ऑनलाईन चालू असून परिक्षा देखील ऑनलाईन सुरु आहेत. या व्हिडीओमधील एका मुलाने तर कहर केला आहे. पंतप्रधान मोदीजी, सात वर्षे शाळा बंद ठेवाव्या लागल्या तरी लागल्या तरी आम्हाला कोणतीही अडचण नाही, असं त्याने म्हटलं आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या चिमुरड्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘नियमांचं तातडीनं पालन करा अन्यथा…,’; केंद्र सरकारचा इशारा

कौतुकास्पद! सर्दी-खोकल्याची लक्षणं दिसल्यानं 3 वर्षाची चिमुकली एकटीच गेली डाॅक्टरकडे

ऑलम्पिकमध्ये खेळाडूंना मिळणार 1 लाख 60 हजार कंडोम पण या कारणामुळे ते वापरू शकणार नाहीत

काहीही झालं तरी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार नाही असं वाटत होतं, पण…- देवेंद्र फडणवीस

“देवेंद्र फडणवीस यांनी फ्रस्टेशनमधून काही बोलू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More