बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रक्त शोधण्यासाठी आई रात्रभर धडपडली, अखेर डाॅक्टरच बनले देवदूत

लखनऊ | उत्तर प्रदेशमध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला रक्ताची गरज आसल्याने तिच्या आईने रात्रभर धडपड केली. मात्र रक्त मिळालं नाही. यानंतर देवदूतासारखे धावून आले ते म्हणजे इमरजन्सी ड्यूटीवर असणारे डाॅक्टर. या डाॅक्टरांनी अल्पवयीन मुलीसाठी आपलं रक्त दान केलं.

एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी बऱ्याच दिवसांपासून गंभीर आजारी होती. दोन दिवसांपुर्वी तिची तब्येत अचानक खालवल्याने तिला तातडीने आयोध्या जिल्हा रुग्णलयात हलवण्यात आलं. मात्र रक्त नसल्याने तिच्यावर उपचार करणं कठीण जात होतं. संबंधित मुलीचं नाव अंशिका असं असून तिला रक्त मिळवण्यासाठी तिच्या आईने आणि नातेवाईकांनी प्रचंड धडपड केली मात्र 2 युनिट रक्त मिळालं नाही.

सकाळी इमरजन्सी ड्यूटीवर तैनात झालेले डाॅक्टर डाॅ. आशिष पाठक आणि डाॅ. अजय तिवारी यांना अंशिकाची प्रकृती प्रचंड गंभीर वाटली. रक्त न मिळाल्याने तिचा जीव जाऊ शकत होता. अशातच काही झालं तर अंशिकाला वाचवायचं असं ठरवून दोन्ही डाॅक्टरांनी आपलं रक्त दान केलं आहे.

दरम्यान, रक्त दान झाल्यानंतर अंशिकावर उपचार करण्यात आला असून या डाॅक्टरांचे भरभरुन सर्वत्र कौतुक केलं जात आहे. एवढंच नाही तर अंशिकाच्या आईने देखील या डाॅक्टरांचे आभार मानले आहेत. डाॅक्टरांच्या या कौतुकास्पद कामगिरीनंतर त्यांना एकप्रकारचे देवदूत म्हटलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

पीएफ खातेदारांनो तात्काळ ‘हे’ काम करा, अन्यथा होईल मोठं नुकसान

‘पुढील दोन महिने धोक्याचे’; कोवीड टास्क फोर्सनं राज्याला दिला गंभीर इशारा

पुण्यातील गॅरेजला भीषण आग; 14 बसेस जळून खाक, दोनजण गंभीर जखमी

‘मीडियावाले उगीच कंड्या पिकवू नका’; फडणवीसांनी माध्यमांना फटकारलं!

मोठी बातमी! एकनाथ खडसे बॉम्बे रूग्णालयात दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More