सातारा | आग्र्यामध्ये बांधण्यात येणाऱ्या मुघल संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं देणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली आहे. यावर भाजप नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं असल्याचं उदयनराजे भोसलेंनी म्हटलं आहे.
महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आग्रा नगरीत ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय हा संपूर्ण देशाला अभिमानास्पद असल्याचं म्हणत उदयनराजेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनापासून अभिनंदन करत आभार मानले आहेत.
दरम्यान, दरम्यान, ऐतिहासिक ताजमहालच्या पूर्वेकडील द्वारावर बांधण्यात हे संग्रहालय बांधण्यात येत असून सुमारे दीडशे कोटींचा हा प्रकल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास या संग्रहालयाच्या माध्यमातून जगभर पोहोवण्याचा यूपी सरकारचा उद्देश आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. pic.twitter.com/8VzUycltWa
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 15, 2020
महत्वाच्या बातम्या-
“ड्रग माफियांची माहिती न देताच ड्रामा क्वीन का परत गेली?”
‘विधी’च्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं पुनर्विलोकन करा- सुनील गव्हाणे
‘अचानक अभिषेक फासावर लटकल्याचा दिसला तर…’; कंगणा राणावतचं जया बच्चन यांना प्रत्युत्तर
व्यापाऱ्याला मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या- शरद पवार
‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’; जया बच्चन यांचा रवि किशन यांना अप्रत्यक्ष टोला