बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी मराठा म्हणून बोलत नाही; जगात जात हा प्रकार नसता तर…- उदयनराजे भोसले

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 6 वर्षांपासून पेटत आहे. पण सर्व पक्ष आग्रही असताना मराठा समाजाला अद्याप  आरक्षण मिळालं नाही. सध्या या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला घेरताना दिसत आहे. यावर खासदार उद्यनराजे भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन भाष्य केलं आहे.

मराठा समाजाचं आरक्षण ही कोणत्या एका पक्षाची नाहीतर सर्व पक्षांची जबाबदारी आहे. हा समाज न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. जगात जात हा प्रकार नसता तर निम्याच्यावर भांडणं झाली नसती, असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

मी मराठा कुटूंबात जन्माला आलो आहे. मी मराठा म्हणून बोलत नाही. त्रयस्थ म्हणून अणि देशाचा एक नागरीक म्हणून माझ्या भावना, माझ्या कुटूंबाच्या भावना मी व्यक्त करतो. जसा प्रत्येकाला न्याय दिला गेला तसा मराठा समाजाला का नाही?, असा प्रश्न उद्यनराजेंनी उपस्थित केला आहे. मराठा समाजाच्या भावना रास्त आहेत. मुलांनी शिकून कुटूंबांना हातभार लावावा अशी अपेक्षा आई-वडिल ठेवतात. त्यांनी काय करावं?, असा प्रश्न देखील उद्यनराजेंनी यावेळी उपस्थित केला आहे.

लोकांनी एकमेकांशी बोलायचं बंद केलं आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण करू नका. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अस्वस्थ समाजबांधवांनी अनेक मोर्च काढले आहे. लोकांची गरज ओळखून तरी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“वाघीण जखमी होते तेव्हा ती अधिक आक्रमक आणि हिंसक होते”

चेअरमन, सोसायटीवर लक्ष ठेवा, अन्यथा…; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरीच्या आयुक्तांचा महत्त्वाचा इशारा

#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

…तर मग सचिवाला मंत्री बनवा तुम्ही राजीनामा देऊन टाका- चित्रा वाघ

ठरलेल्या दिवशीच MPSC परीक्षा घ्या- अमित ठाकरे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More