Top News महाराष्ट्र मुंबई

…तसा प्रयत्न केल्यास आम्ही शेतकऱ्यांचा मोर्चा रोखणार- विश्वास नांगरे पाटील

मुंबई | केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत चालू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील शेतकरी मुंबईतील आझाद मैदानावर जमले आहेत. राजभवनावर जाण्याची आंदोलकांची इच्छा आहे. मात्र मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यावर शेतकऱ्यांना मोर्चा रोखण्याचा इशारा दिला आहे.

आदेशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चाला परवानगी देता येत‌ नाही. यासंदर्भात आम्ही मोर्चाशी संबंधित शिष्टमंडळ आणि नेतेमंडळींची भेट घेतली आहे. आहे. त्यांनी राजभवनाकडे जाण्याचा प्रयत्न केलाच तर आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे शिष्टमंडळ राजभवनापर्यंत घेऊन जाऊ, असं विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वमीवर दक्षिण मुंबईत 800च्यावर पोलीस कर्मचारी, अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत आंदोलक शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही नांगरे पाटलांनी मोर्चातील शेतकऱ्यांना केलं आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, भाकपचे नेते कॉम्रेड नरसय्या आडाम, मुंबई काँग्रेस प्रमुख भाई जगताप आणि अबू आझमी इ. नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागेल”

आठवले माफी मागा!; शेतकरी आंदोलनावरील वक्तव्याने राष्ट्रवादी आक्रमक

शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं; रामदास आठवलेंचा सल्ला

देशातला सर्वसामान्य माणूस कायदा आणि तुम्हाला दोघांनाही उद्ध्वस्त करणार- शरद पवार

गुदगुल्या करणं जीवावर बेतलं; दोन मित्रांच्या मृत्यूनं खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या