बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आयपीएल खेळणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनो… तुम्हीही भारताला मदत करा”

मुंबई | आयपीएलमधील कोलकाता संघातील अष्टपैलू परदेशी खेळाडू पॅट कमिन्सने भारतातील कोरोनाची स्थिती पाहता मदत करण्याचा निर्णय घेतला. पॅट कमिन्सने 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 30 लाख रुपयांची मदत पीएम केअर फंडाला दान केले आहेत. कमिन्सने खेळाच्या पलीकडे जाऊन भारतीयांची मनं जिंकली आहेत. त्यासह त्याने इतर खेळाडूंनाही मदतीसाठी आवाहन केलं आहे.

एक खेळाडू म्हणून माझीही काही जबाबदारी आहे आणि मी पीएम केअर फंडासाठी काही निधी दान करत आहे. विशेषकरून भारतातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या खरेदीसाठी हा निधी असेल. आयपीएलमधील मी माझ्या सहकाऱ्यांनाही मदतीचं आवाहन करतो, असं पॅट कमिन्सने म्हटलं आहे. या मदतीबाबत त्याने आपल्या ट्विटवरून माहिती दिली आहे.

आयपीएलसह भारतात इतके खेळाडू आहेत परंतू एकाही खेळाडूला आपल्या देशातील परिस्थितीचं गांभीर्य नाही की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी यांनी पुढे येऊन स्वत: मदत केली पाहिजे. मात्र तसं न होता एक परदेशी खेळाडू पुढाकार घेत अशा प्रकारची मदत करतो हे मोठी गोष्ट आहे. कमिन्सने केलेल्या आवाहनानंतर किती खेळाडू मदत करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, भारतातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीव रपरदेशी खेळाडूंच्या माघारीचे सत्र सुरूच आहे. आरसीबीचा अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी माघार घेतली. तर राजस्थान रॉयल्सच्या लायम लिव्हिंगस्टोन आणि अँड्य्रू टाय यांनीही बायो बललला कंटाळून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला.

 

थोडक्यात बातम्या- 

“आता लोकांनी घरातही मास्क घालण्याची वेळ आली आहे”

रक्ताच्या नात्यानेच फिरवली पाठ! आईला कोरोना झाल्यामुळे मुलाने…

धक्कादायक! पत्नीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने पतीने केलं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य

मोफत लसीकरणाने महाराष्ट्राच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा

परदेशी खेळाडूला पहावले नाहीत भारतीयांचे हाल, ॲाक्सिजनच्या पूर्ततेसाठी 37 लाखांची मदत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More