बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मम्मी बरी झालेली, पण ॲाक्सिजन संपला अन् फडफड कोंबडीवाणी मेली ती”

नाशिक | नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आज सुमारे साडे बाराच्या दरम्यान अचानक ऑक्सीजन टँकची गळती सुरु झाली. त्यानंतर संपुर्ण रुग्णालयात गोंधळ उडाला. जवळपास एक-दिड तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही गळती थांबवण्यात यश आलं. मात्र या घटनेमध्ये एकूण 22 जणांनी आपला जीव गमवला आहे. या संपुर्ण घटनेनंतर एका महिलेने आपल्या आईचं निधन झाल्यामुळे रुग्णालयाच्या बाहेरच हंबरडा फोडला.

आईच्या जाण्याने महिलेवर दुःखाचा डोंगर कोसळला. यादरम्यान, “माझी मम्मी क्लीअर झाली होती, फार चांगली होती, जेवण करत होती. अर्ध्या तासापूर्वी व्हेंटिलेटर बंद पडलं अन् फडफड कोंबडीवाणी मेली ती फडफडून”, अशा शब्दात महिलेने रुग्णालयाबाहेर आक्रोश केला. एवढंच नाही तर तिच्याजवळ कोणी न आल्या कारणाने तिचा मृत्यू झाल्याचं देखील यावेळी महिलेने म्हटलं आहे.

आपल्या जीवाच्या आकांताने महिला आपलं दुःख आणि रुग्णालयातील अडचणी सांगत होती. यामध्ये तिने दोन-दोन दिवस लोक वेटिंगवर ठेवत असल्याचं सांगितलं आहे. एवढंच नाही तर आपला आक्रोश व्यक्त करताना हे हॉटेल आहे का की वेटिंगवर ठेवता? असा सवाल देखील महिलेने केला आहे. दोन दिवस आपली मम्मी वेटिंगवर होती, तेव्हा हॉस्पिटलने रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर त्यांनी अॅडमीट केल्याचं महिलेने म्हटलं आहे.

दरम्यान, झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सीजन गळतीमध्ये एकूण 22 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 11 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे. तसेच या घटनेमध्ये अधिक लोकांचा देखील मृत्यू झाला असल्याची शक्यता दर्शिविण्यात आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न”, मुख्यमंत्र्यांची मृतांच्या वारसांना प्रत्येकी ‘इतक्या’ लाखांची मदत

राजकारण बाजूला सारून समाजकारण करणारा नेता; सर्व धर्मीयांचे 114 अंत्यविधी पार पाडले

“…म्हणून शेवटचा पर्याय म्हणून लाॅकडाऊनचा विचार करावा लागतोय”- राजेश टोपे

“नाशिकच्या ऑक्सिजन गळतीमधील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणार मदत”

एकाच विमानात 53 कोरोनारुग्ण आढळल्याने ‘या’ देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर घातली बंदी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More