बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंच्या पत्रानंतर ‘नाणार’वासीय म्हणतात; ‘गुजराती मारवाड्यांच्या गुंतवणुकीत अडकलेला पैसा….’

रत्नागिरी | राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर नाणार प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्याशी पत्रव्यवहार करून नाणार प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मात्र नाणार रिफायनरी विरोधी संघर्ष समितीनं याच पार्श्वभूमीवर आता आक्रमक पवित्रा घेत आपला विरोध कायम ठेवला आहे.

संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांनी विरोध व्यक्त करताना म्हटलं की,नाणार वासीयांवर गोळ्या झाडून हा प्रकल्प आणणार आहात का? कोकणवासीयांची राजकीय नेत्यांना खरंच एवढी काळजी असेल तर कोकणात पिकणारा आंबा, फणस, काजू, बांबू यावर प्रक्रिया करणारे व्यवसाय निर्माण करून त्यातून रोजगार अन् व्यवसाय निर्माण करा.

पर्यटन व्यवसायातूनही रोजगार निर्मिती साध्य होऊ शकते त्याचं आम्ही नक्कीच स्वागत करू. मात्र गुजराती मारवाड्यांच्या गुंतवणुकीत अडकलेला जो पैसा आहे तो काढण्यासाठी जर कुणी रिफायनरीला समर्थन देत असेल तर नाणार येथे असलेल्या हजारो लोकांचे तुम्ही बळी घेणार आहात का, असा संतप्त सवाल वालम यांनी उभा केला आहे.

दरम्यान आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये, असं म्हणत राज ठाकरे यांनी नुकताच नाणार प्रकल्पाला आपलं समर्थन दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘या’ तारखेला अन्नत्याग आणि पदयात्रा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणं अशक्य- नवाब मलिक

मिथुन चक्रवर्ती अखेर ‘भाजप’च्या वाटेवर; कोलकाताच्या रॅलीत केला पक्षप्रवेश…

‘राज ठाकरेंच्या ‘त्या’ आवाहनामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला’, पोलिसात तक्रार दाखल

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परदेशात जायला वेळ पण…’; शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More