बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानमधील वास्तव सांगताना खासदाराच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले…

नवी दिल्ली | अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती गंभीर होत चालली आहे.  अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेले नागरिक आता हळुहळु बाहेर पडत आहेत. भारतीय हवाई दलाचं सी-17 विमान आज सकाळी काबूलहून 168 जणांना घेऊन भारतात दाखल झालं. त्या विमानामधून हिंदू, शीख आणि काही अफगाणी नागरिक भारतात आले. अफगाणिस्तानातील परिस्थितीचं गांभीर्य सांगताना एका शीख खासदारांच्या डोळ्यात पाणी आलं.

भारतीय हवाई दलाच्या वायू सेनेचे विमान गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर उतरलं. या विमानामध्ये अनेक लहान मुलं महिलांसह भारतीय राजदुतावासात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यावेळी 168 जणांची काळजी भारतीय वायू सेनेकडून घेण्यात आली. या विमानात अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंद्रसिंह खालसा हेही होते.

एअरबेसवर विमान उतरताच पत्रकारांनी खालसा यांच्याशी संवाद साधला. तेव्हा अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल प्रश्न विचारताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अफगाणिस्तानात गेल्या 20 वर्षांत जे काही झाले होते, ते सर्व संपत चाललंय. सगळं शुन्यावर यायला लागलंय, असं अफगाणिस्तानातील परस्थितीबाबत नरेंद्रसिंह खालसा यांनी माहिती दिली.

दरम्यान, गेल्या 24 तासात 390 भारतीयांना अफगाणिस्तानमधून सुटका करून आपल्या मायदेशी सुखरूप परत आणलं आहे. तर आज सकाळी 160 जणांना घेऊन भारतीय विमान अफगाणिस्तानातून आलं आणि एअर इंडियाचं विमान आणखी 87 जणांना दिल्ली विमानतळावर आज दाखल होणार आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत ‘मोदी’ एक्सप्रेस, असा असणार मार्ग!

‘कुत्री कितीही भुंकली तरी…’; इंदोरीकर महाराजांचा निलेश लंकेंना पाठिंबा

‘माझ्या बहिणीपासून लांब रहा’; ‘त्या’ वेळी रोहितला युवराज सिंहने दिली होती धमकी!

“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”

“भाजप लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे, राणेंना प्रसिद्धीचा मोह”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More