बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील एकमेव आमदार! कोरोना काळात केलेल्या कामामुळे निलेश लंकेंचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ ने सन्मान

अहमदनगर | कोरोना महामारीने मागील दोन महिन्यांमागे हैदोस घातला होता. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. वाढत्या संख्येमुळे बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यावेळी अनेक रूग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून अनेकांनी आपला प्राण गमवला. यादरम्यान अहमदनगरमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी खऱ्या अर्थाने जनतेचे नेतृत्त्व करत आपल्या लोकांसाठी कोरोना सेंटर उभारत आधार दिला.

निलेश लंकेंच्या कोरोना सेंटरची चर्चा राज्यभर होती.  त्यांनी भावळणी इथं तब्बल 1 हजार 100 बेडचं कोविड सेंटर सुरु केलं. कोविड सेंटर उभारलं नाही तर निलेश लंके कोरोना रुग्णांवरील औषधोपचार, त्यांचा आहार आदी गोष्टींकडेही स्वत: वैयक्तिक डॉक्टरप्रमाणे लक्ष देत होते .

निलेश लंकेंच्या कामाची चर्चा साऱ्या देशभर होतीच मात्र त्यांच्या कामाचा डंका सातासमुद्रापार गेला आहे. त्यांच्या या कामाचं कौतुक ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’कडून करण्यात आलं आहे. याबाबत निलेश लंके यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती दिली. अशा प्रकारे सन्मान होणारे निलेश लंके महाराष्ट्रातील पहिले आमदार ठरले आहेत.

दरम्यान, कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट आहे. हे सगळं माझ्यावर प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळे आणि सहकारी यांच्यामुळे शक्य झाल्याचं निलेश लंके म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या- 

आठ वर्षीय चिमुकलीनं स्वर्गाचा पत्ता टाकत लिहिलं दिवंगत वडिलांना पत्र!

“नरेंद्र मोदींची आता झोळी घेऊन जाण्याची वेळ आली”

‘या’ मंदिरात दर्शनासाठी लागणार लसीकरण प्रमाणपत्र!

पेरण्या खोळंबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; ‘या’ जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

‘लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून लसीकरण केलं म्हणजे उपकार नाही’; पवारांनी युजीसीवर साधला निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More