मुंबई | पुण्यात एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदूंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी शरजील उस्मानीवर निशाणा साधला आहे.
एक हरामी सर्जील उस्मानी हिंदू समाजावर टीका करतो पण त्याच्यावर फक्त एफआयआर दाखल केला जातो. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे. परत कुठल्या हरमीची हिम्मत होणार नाही हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघायची, अशा शब्दात निलेश राणेंनी टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शरजील उस्मानीला अटक करण्याची मागणी केली आहे. उस्मानीच्या या वक्तव्यावर राज्यातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, आजचा हिंदू समाज सगळैा सडलेला आहे. हिंदू समाद हत्या करतो. घरी जाऊन अंघोळ करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो, असं शरजील उस्मानी एल्गार परिषदेत बोलला होता.
एक हरामी शरजील उस्मानी हिंदू समाजावर टीका करतो पण त्याच्यावर फक्त FIR केली जाते. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे, परत कुठल्या हरामीची हिम्मत होणार नाही हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघायची.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 3, 2021
थोडक्यात बातम्या-
‘आजचा हिंदू समाज सगळा सडलेला आहे’; शरजील उस्मानीचं वादग्रस्त वक्तव्य
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ‘या’ मराठी दिग्दर्शकाला एनसीबीनं घेतलं ताब्यात
‘ट्रॅक्टर आणि जेसीबी…’; संजय राऊत-राकेश टिकैत भेटीवर कुणाल कामरा म्हणाला…
“शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं”