नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 99 हजार 300 कोटी तर कौशल्य विकासासाठी 3000 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
जिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये बनवण्याची योजना देखील तयार केली जाईल. तरुण अभियंत्यांना स्थानिक संस्थांमध्ये काम करण्यासाठी इंटर्नशिपची सुविधा दिली जाईल. मोदी सरकारने आता पूर्णपणे नवीन शिक्षण धोरण आणण्याचा निर्णय घेतला असल्याचं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
सरकार उच्च शिक्षण सुधारण्याचे काम करीत आहे. जगातील विद्यार्थ्यांना भारतात अभ्यासासाठी सुविधा पुरविल्या जातील. त्यासोबत भारतातील विद्यार्थ्यांना आशिया, आफ्रिका मधील देशांमध्ये देखील पाठवले जाणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मार्च 2021 पर्यंत डिप्लोमा कोर्सेससाठी दीडशे नव्या संस्था निर्माण करणार आहे.रोजगार देणाऱ्या शिक्षणावर भर देणार असून डिप्लोमासाठी 2021 पर्यंत नवीन संस्था उभारणार असल्याचंही सीतारामण यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“आशिष शेलारांना टिंगलटवाळीशिवाय काही काम उरलं नाही”
…म्हणून मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं- उद्धव ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार; मोदी सरकारचा संकल्प
शेतकरी आणि ग्रामीण भारतासाठी निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश- निर्मला सीतारामन
Comments are closed.