आता लग्नाला फक्त 20 लोकांनाच परवानगी; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध लागू!
जालना | कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येते की काय याची भीती अनेकांच्या मनात आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातही कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येथील जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी नव्याने कडक निर्बंध लागू केले आहेत.
नव्या नियमांनुसार यानंतर लग्नसमारंभात फक्त 20 जणांनाच जाण्यासाठी परवानगी असेल. 20 पेक्षा जास्त नागरिकांनी लग्नसमारंभात भाग घेतल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, जिल्ह्यातील नगरपरिषद, नगर पंचायत हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रात्री 7 वाजेनंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. नगरपरिषद हद्दीतील हाॅटेल, खानावळी, बार, रेस्टाॅरंट पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे नवे आदेश 31 मार्चपर्यंत लागू असतील.
जालना शहरातील सर्व दुकानदारांना दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील व्यायामशाळा, जीम पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात धार्मिक सभा, राजकीय सभा, रॅली, मिरवणूक, धरणे, मोर्चे आंदोलनं तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांवरसुद्धा पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. वरील आदेश हे 31 मार्च पर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी आदेश दिले आहेत.
दरम्यान, राज्यात काल 13 हजार 659 नवे कोरोना रुग्ण सापडले. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 22 लाख 52 हजार 057 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 99 हजार 008 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.21% पर्यंत खाली आले आहे. तर दिवसभरात राज्यात 54 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.
थोडक्यात बातम्या –
महाराष्ट्रातील ‘या’ प्रमुख धार्मिक ठिकाणी संचारबंदी; गुलाल उधळणे, पेढे वाटण्यास सक्त मनाई
आमदार निधीत एवढ्या कोटींची वाढ; अजित पवारांची मोठी घोषणा!
महाराष्ट्रातील ‘या’ शहरांची चिंता वाढली; आजपासून कठोर निर्बंध
धक्कादायक! रागाच्या भरात डिलिव्हरी बॉयनं फोडलं तरुणीचं नाक, कारण ऐकून तुम्हाही व्हाल हैराण
राज्यात कोरोनाचा उद्रेक; आजची आकडेवारीही अत्यंत धक्कादायक
Comments are closed.