बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोडांनी आधीच राजीनामा दिला असता तर…- पंकजा मुंडे

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर येत होतं. मात्र विरोधकांनी टीका करत मुख्यमंत्र्यांवर या दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच विरोधकांनी 1 मार्चला सुरू होणार अधिवेशन सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही दिला होता. याच पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येेत आहेत. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यावरून संजय राठोडांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय यांनी राजीनामा दिला हा मुद्दा नसून निष्पक्षपणे चौकशी होणं हा मुद्दा आहे. त्या क्लिपमध्ये आवाज कुणाचा आहे हे शोधणं यंत्रणेचं काम आहे. या प्रकरणावरून कोणतंही राजकारण होता कामा नये, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

संजय राठोड यांनी आधीच राजीनामा दिला असता तर त्यांची प्रतिमा इतकी मलिन झाली नसती. आता उशिरा राजीनामा दिल्याने प्रतिमा उजळेल असं नाही. मात्र चुकीच्या प्रवृत्तींना आळा घातलाच गेला पाहिजे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्ही मागच्या पिढीचे आदर्श घेऊन घडत गेलो पण आज वेगळेच ट्रेंड सेट होत आहेत. आमच्या पिढीकडून पुढच्या पिढीने काय घेतलं पाहिजे?, आम्ही काय ट्रेंड सेट करत आहोत? या सर्व गोष्टींचा चौफेर विचार करायला पाहिजे असल्याचं म्हणत पंकजा मुंडेंनी राठोड यांच्यावर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

अवघ्या तीन वर्षात भाजपला रामराम ठोकत ‘या’ नेत्याने केली काँग्रेसमध्ये घरवापसी

सातारा जिल्ह्यातील कुटुंब राबवत आहे पाकिस्तानात ‘हा’ आगळावेगळा उपक्रम

शरद पवारांनी कोरोनाची लस घेत दिला ‘हा’ मोलाचा सल्ला; म्हणाले…

मोदी सरकारने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत – नाना पटोले

“आदित्य ठाकरेंनी सांगितल्यानं पब आणि बार बिनधास्त सुरु”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More