बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांना मोठा धक्का; 2 कुख्यात टोळ्यांमधील ‘या’ 13 जणांवर मोक्का!

पुणे | पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून सूटका झाली. त्यानंतर त्याने मुंबई-पुणे महामार्गावर धुडगूस घातला होता. त्यानंतर पोलिसांनी सक्तीने कारवाई करत गुडांवर चाप बसवला होता. वर्चस्वाच्या लढाईतून आणि दहशत निर्माण करण्यासाठी शहरातील काही टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा पुण्यातील वाढती गुंडगिरी चर्चेचा विषय ठरली होती. त्यावर पोलिसांनी आता थेट कारवाई करत पाऊल उचललं आहे.

शहरात दहशद माजवणाऱ्या आंदेकर आणि लोखंडे टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यात 13 जणांवर कारवाई केली असून त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 16 मार्चपर्यतची पोलिस कोठडी सुनावली आहे. यामध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सुर्यकांत राणोजी आंदेकर याचा समावेश आहे. तर लोखंडे टोळीतील म्होरक्या जयेश विजय लोखंडे याचा समावेश आहे.

सुर्यकांत राणोजी आंदेकर आणि नंदकुमार बाबूराव नाईक यांना उपचारासाठी रूग्णालययात दाखल करण्यात आलं आहे. तर टोळीतील इतर 11 जणांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या कारवाई मधून पुण्यातल्या वाढत्या गुंडागिरीवर चाप बसवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल.

सुर्यकांत आंदेकर, नंदकुमार नाईक, ऋषभ आंदेकर, हितेंद्र यादव, दानिश शेख, योगेश डोंगरे, विक्रम शितोळे, अक्षय अकोलकर, शक्ती वाडेकर, प्रतीक शिंदे, यश चव्हाण, देवीदास गालफांडे, वैभव शहापूरकर अशी मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या टोळीतील गुंडांची नावं आहेत.

थोडक्यात बातम्या-

रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाय ठेवणं आता आणखी महाग; 50 रुपये मोजावे लागणार!

थकबाकीदारांची वीज कापणारच; महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या-रजा रद्द

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; ‘या’ तारखेपासून होणार पगारवाढ?

ममता बॅनर्जींवरील हल्ल्याला वेगळं वळण; प्रत्यक्षदर्शीनं केला ‘हा’ मोठा खुलासा

आता लग्नाला फक्त 20 लोकांनाच परवानगी; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध लागू!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More