महाराष्ट्र मुंबई

अभिनेत्री पूजा बेदीने खिल्ली ‘जनता कर्फ्यू’ची उडवली खिल्ली; म्हणाली…

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधत, कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. आज देशभरात जनता कर्फ्यू  लागू केला आहे. मात्र या जनता कर्फ्यूची अभिनेत्री पूजा बेदी हिने खिल्ली उडवली आहे.

भारताने घरात बसून ताटं वाजवण्यापेक्षा करोनाशी सामना कसा करावा? याबाबत विचार करायला हवा. तसेच होणारी आर्थिक हानी भरुन काढण्यासाठी पुरेशी तयारी करायला हवी, असं पूजा बेदीने म्हटलं आहे.

निर्मला सितारामन यांनी एक चांगली योजना घेऊन देशवासीयांसमोर यावं. इतर देश करोनाशी लढण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहेत. मग भारत का नाही?”,अशा आशयाचं ट्विट पूजा बेदी हिने केलं आहे.

दरम्यान, या ट्विटच्या माध्यमातून तिने केंद्र सरकारने करोना विषाणूशी लढण्यासाठी केलेल्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तिने केलेल्या ट्विटवर लोकांनी तिला ट्रोल केलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

“मोदींनी केलेल्या आवाहनाची खिल्ली उडवू नका… माझे कुटुंब देखील कॉरन्टाईन”

संजय राऊत यांच्या ‘देवांनी मैदान सोडलं’ या अग्रलेखाचं काँग्रेसकडून जोरदार स्वागत

महत्वाच्या बातम्या-

“आपणच आमचे खरे हिरो आहात, एकत्रितपणे ही लढाई नक्की जिंकू”

“निर्भयाला न्याय मिळाला आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची”

“माझ्या देशात महिलांना न्याय मिळतोच याचा मला अभिमान”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या