Top News

“आर.आर.पाटलांनंतर आता राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता करतोय भिडेंचा बचाव”

पुणे | शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या बचावासाठी आधी आर. आर. पाटील होते. आता राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एका वृत्त वाहिनाशी ते बोलत होते.

पोलीस अधीक्षकांच्या वतीने सर्वोच्च न्यालायात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. संभाजी भिडेंच्या बचावाला पूर्वी आर आर पाटील होते. आता जयंत पाटील आहेत. भाजपचं काम काही मंत्रीच करत आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास ‘एनआयए’कडे देण्याचा निर्णय निषेधार्ह आणि चुकीचा आहे. तपासातील खोटेपणा उघड होण्याची केंद्र सरकारला भीती वाटते, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारचा राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या या वर्चस्वाच्या लढाईत आरोपींचा बळी जातोय का? याची चिंता वाटत असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या