Top News महाराष्ट्र मुंबई

चित्राताई ठेचतील या भीतीने नागोबा बाहेर आला- प्रसाद लाड

Photo Credit - Facebook / Prasad lad, Chitra Wagh And @gorsanjaydr

मुंबई | शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी वाशिम जिल्ह्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत भाजप नेते प्रसाद लाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बिळातला नाग बाहेर आला, त्या नागोबाला माहित होतं आपण जर बाहेर आलो नाही तर चित्राताई त्याला ठेचून काढतील. या भितीने नागोबा बाहेर आला आहे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.  पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

आम्हाला संजय राठोड यांनी सांगितलेल्या गोष्टीवर आक्षेप आहे की माननीय मुख्यमंत्री चौकशी करत आहेत. पोलीस महानिरीक्षकाला त्यांनी चौकशी करायला सांगितली आहे. चित्रा ताई वाघ यांनी काल पोलीस महानिरीक्षकांची आणि राज्यपालांची भेट घेतली. आम्हाला कुठल्याही प्रकारे पोलीस निपक्षपातपणे चौकशी करत आहेत असं वाटत नाही. त्यामुळे आज मी स्व:त पत्र लिहून मुख्यमंत्र्याना सीबीआईची निपक्षपातपणे चौकशी करावी अशी मी मागणी करत आहे, असं लाड यांनी सांगितलं.

जो मंत्री पदावर बसला आहे, त्या मंत्र्याची त्या खात्याची पोलिसांनी कसून चौकशी करावी. ही अतिशय घृणास्पद गोष्ट आहे. त्यांची चौकशी निपक्षपातपणे होणार नाही आणि कै. पुजा चव्हाणला न्याय मिळणार नाही अशी आम्हाला खात्री आहे, असंही लाड म्हणाले. यावेळी लाड यांनी पत्रकार परिषदेत एक क्लिप माध्यमांना ऐकवून दाखवली. त्यामध्ये राष्ट्रवादी भटक्या विमूक्त जमाती सेलचे अध्यक्ष यांनी संजय राठोड यांच्यावर टीका केली आहे.

या व्यतिरिक्त मुख्य असा गौप्यस्फोट मी तुमच्यासमोर करत आहे. एक क्लिप माझ्याकडे आली आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी भटक्या विमूक्त जमाती सेलचे अध्यक्षांनी संजय राठोडला आमचा आणि आमच्या पक्षाचा भटक्या विमूक्त जमातीच्या लोकांचा विरोध आहे, असं बोलत आहेत. ही क्लिप लाड यांनी पत्रकर परिषदेत ऐकवून दाखवली.

दरम्यान, या राज्यातील बरेचसे मंत्री संजय राठोडला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचा चालणारा हा केविलवाणा प्रयत्न हा भाजपचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करुन घेणार नाही, असं म्हणत लाड यांनी सरकारवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दाचे पक्के होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र लबाड”

रायगडावर महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचं असेल तर पाळावे लागणार ‘हे’ नियम!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ‘तो’ व्हिडीओ झाला लीक, संजय राठोडांचा संबंध असल्याचा दावा!

राज्य सरकारमधील ‘या’ नेत्यांवर कारवाई का होत नाही?- भाजप

…तोपर्यंत पतंजलीच्या ‘कोरोनिल’ विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या