बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रियांका चोप्राने मुंबईमधील दोन अलिशान बंगले विकले, ‘इतक्या’ कोटींची झाली डील

मुंबई | प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुंबईमधील तिचे दोन बंगले विकले आहेत. काही महिन्यांपुर्वीच जॅकलिन फर्नांडिसने प्रियांकाचं एक घर विकत घेतलं होतं. त्यानंतर आता प्रियांकाने विकलेल्या घराचे कोटीमध्ये डील झाले असून रक्कम ऐकून कोणालाही धक्का बसेल.

प्रियांकाने अमेरिकन सिंगर निक जोनस सोबत लग्न केलं आहे. त्यामुळे ती तिकडे स्थायिक झाली असून हाॅलिवूडमध्ये तिला आपली एक ओळख बनवायची आहे. प्रियांका आता हाॅलिवूडच्या ‘मॅट्रीक्स 4’, टेक्स्ट ‘फाॅर यू’ या चित्रपटांसाठी काम करत आहे. अशातच प्रियांका परदेशी आपलं करिअर, भविष्य सेट करत असताना मुंबईमधील मालमत्ता प्रियांका हळूहळू कमी करत आहे.

प्रियांकाने राज क्लासिक, वर्सोवा, अंधेरीतील प्राॅपर्टी एकूण 7 कोटी रुपयांना विकली आहे. तसेच तेराव्या मजल्यावर असलेला एक फ्लॅट देखील तिने 3 कोटी रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच आणखीन एक फ्लॅट तिने 4 कोटी रुपयांना विकला आहे. एवढंच नाही तर मुंबईतील तिचे ऑफिस तिने एका कंपनीला भाड्यानं दिलं आहे.

दरम्यान, प्रियांका सध्या अमेरिकामध्ये असून ती आता ‘सिटाडेल’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रियांकाने अभिनयाच्या जोरावर बाॅलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

थोडक्यात बातम्या-

पत्नीचा वाढदिवस विसरणं पतीला पडलं महागात, पत्नीने केलं असं काही की…

“फटे लेकीन हटे नही, सोनियासेनेच्या प्रवक्त्यांना हतबलतेनं बीफचंही समर्थन करावं लागतंय”

“लग्नानंतरही त्याचे अनेक महिलांशी शारिरीक संबंध होते”

“पवार कुटुंब किती लबाड आहे हे राज्याला चांगलं माहित आहे”

सोनाली कुलकर्णीचा बोल्ड बिकीनी लुक पाहून सर्वच हैराण, सोनालीचे मालदीवमधले फोटो व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More