बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

पुणे | पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, अस आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पुण्यातही कोरोना आपले हातपाय पसरवत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 963 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 659 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 9 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. मृतांमधील 5 रुग्ण पुण्याबाहेरील आहे.

पुण्यात सध्या 321 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,73,046 इतकी आहे. तर पुण्यात 6460 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4885 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,96,001 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7609 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅंण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने पुढाकार घेऊन एका गटाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील प्रमुख रुग्णालयांचे पदाधिकारी, पुणे-पिंपरीचिंचवडचे आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी आणि पुण्यातील एमसीसीआयएमचे मेंबर्सचा समावेश आहे.

थोडक्यात बातमी –

आजच्या काळातील ‘झाशीची राणी’; ‘या’ व्हिडीओमुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव

बाबो! 8 वर्षीय मुलानं ‘ही’ गेम खेळून मिळवलेत तब्बल 24 लाख; सविस्तर वाचा…

उद्धव ठाकरेंनी स्वखर्चाने एखादी बालवाडी काढुन दाखवावी- नारायण राणे

पुजा चव्हाण प्रकरणात भाजप नगरसेवकाला पुणे पोलिसांची नोटीस

‘कोरोनाचा हा राक्षस…’; मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या भराडी देवीकडे मागीतलं ‘हे’ साकडं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More