पुणे | जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर सध्या सर्व जगाने आवश्यक काळजी घेत मात केली आहे. मात म्हणजे प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शन तत्वांनुसार सर्व सुरळीतपणे चालू झालं आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत मत व्यक्त केलं आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यताही कमी असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. थंडीत कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं बोललं जात होतं.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून निधी मागणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान, साथी, युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्र, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन आणि जन आरोग्य अभियानच्या वतीने परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर आयोजित वेबिनारमध्ये टोपे बोलत होते.
थोडक्यात बातम्या-
डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबावर ओढावलं आणखी एक संकट
“शेतकऱ्यांनी तुुम्हाला विश्वासाने परत सत्ता दिली मात्र बळीराजाच्या विश्वासाला केंद्राने तडा दिला”
पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील 47 आरोपींना जामीन मंजूर!
दिलीपकुमार यांची प्रकृती ठीक नाही, त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा- सायरा बानो
कोरोना लसीबाबत अदर पुनावाला यांची मोठी घोषणा; “२०२० संपण्यापूर्वीच…”