बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुन्हा लॉकडाऊनबाबत राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | मागील वर्षी जगभरात हैदोस घासणाऱ्या कोरोना व्हायरस नियंत्रणात आला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्याही कमी प्रमाणात असून कोरोनाची लागणसुद्धा कमी प्रमाणात होत होती. त्यामुळे सरकारने हळूहळू सर्व दरवाजे उघडे करायला सुरूवात केली होती. मात्र पुन्हा राज्यात कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत  मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यातील आणि मुंबईतील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

मुंबईमध्ये लोकलसेवा सुरू केल्यापासून मुंबतील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. लोकलमध्ये नागरिक सोशल डिस्टेंसिंगचं पालन करत नाहीत. त्यासोबतच मास्कही काहीजण वापरताना दिसत नाही आणि गर्दीही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र सर्वांनी सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करायला हवं.

दरम्यान, 1 फेब्रुवारीला लोकल सेवा चालू करण्यात आली होती त्यानंतर 10 फेब्रुवारीला मुंबईत 558 कोरोना रुग्ण आढळून आले. तर सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 369 असल्याची माहिती आहे. आतापर्यंत 11, 400 मृत्यूचा आकडा नोंदवला आहे.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तृप्ती देसाई आक्रमक, सरकारवर केला ‘हा’ गंभीर आरोप

“होळकरांच्या सामाजिक कार्याचा उपयोग करून राजकीय स्वार्थ साधण्याचा शरद पवारांचा प्रयत्न”

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”

‘नाद करा पण आमचा कुठं’, हेलिकॉप्टरमधून येत ‘या’ गावच्या सरपंचानं घेतली शपथ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांवर केले धक्कादायक आरोप!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More