Top News औरंगाबाद महाराष्ट्र

जातिवादाचा कोरोना कधी नष्ट होणार?; रामदास आठवलेंचा सवाल

Loading...

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा गावात बौद्ध कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात भीमराज गायकवाड या निर्दोष विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी संताप व्यक्त केला आहे.

कोरोना या साथीच्या रोगाला अटकाव घालण्यास सरकार आणि समाज गुंतले असले तरी शेकडो वर्षांपासून थैमान घालणाऱ्या जातीवादाच्या कोरोनावर सरकारसोबत मिळून समाज कधी आळा घालणार आहे, असा  सवाल रामदास आठवले यांनी केला आहे.

Loading...

मानवतेला काळिमा फासणाऱ्या या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करून हल्लेखोरांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

गायकवाड कुटुंबातील मोठ्या मुलाचे आंतरजातीय प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून जातीवादी मानसिकतेतून हा हल्ला आरोपींनी केला असल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली ‘ही’ विनंती

जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी घेणार नाही- बबनराव लोणीकर

महत्वाच्या बातम्या-

“आपणच आमचे खरे हिरो आहात, एकत्रितपणे ही लढाई नक्की जिंकू”

“निर्भयाला न्याय मिळाला आता प्रतीक्षा कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळण्याची”

“माझ्या देशात महिलांना न्याय मिळतोच याचा मला अभिमान”

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या