बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर ठरते उपायकारक???; कोर्टाने दिला निकाल

नवी दिल्ली | देशभर सध्या कोरोना लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. मात्र दोन्ही लसीचे डोस घेऊन देखील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक आजारांवर सर्वांच्या घरात पारंपारिक उपचार केले जातात. अशातच कोरोनावर एक पारंपारिक उपाय परिणामकारक ठरत असल्याचं समोर आलं आहे.

कोरोना आजारावर लाल मुंग्यांची चटणी अधिक परिणाकारक ठरत असल्याचं समोर आलं आहे. या उपचारासाठी एका व्यक्तीने हायकोर्टात याचिक दाखल केली होती. त्यानंतर यावर तपास करावा अशी मागणी देखील त्याने केली. आयुष मंत्रालयाने करण्यात आलेला दावा कितपत खरा आहे, याचं संशोधन करावं, असा आदेश हायकोर्टाने दिला होता.

ओडिशामध्ये रहिवासी असणारे पाढीयाल यांनी ही याचिका कोर्टात दिली होती. आदिवासी समाजात कोरोना कमी प्रमाणात आढळतो. अनेक राज्यांमध्ये आजारांवर लाल मुग्यांचे सेवन केलं जातं. अशाच राज्यांमध्ये कोरोना देखील कमी आढळत असल्याने लाल मुंग्यांच्या सेवनामुळेच कोरोना कमी असल्याची शक्यता पाढीयाल यांनी दर्शवली आहे.

दरम्यान, ओडिशा हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पाढीयाल यांनी या चटणीत कोणत्या गोष्टींचा समावेश गरजेचा आहे हे देखील सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लालबागच्या राजाचं ऑनलाईन दर्शन घेता येणार, प्रसादही घरपोच मिळेल

पुतीन यांनी तालिबान सरकारला खडसावलं, म्हणाले…

गणेशोत्सवाआधीच राज्यात कोरोनाचा रूद्रावतार; रुग्णांचा आकडा पुन्हा 50 हजार पार

गर्भवती महिलेला तराफ्यावरून नदी पार करत पोहचवलं रुग्णालयात, वाचा थरारक प्रवास

“मोदी देश विकायला निघालेत, त्यामुळे 2024 हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं “

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More