Top News अहमदनगर महाराष्ट्र

“राज्यातील दोन दिवसाचं अधिवेशन आठवं आश्चर्य तर केंद्राने रद्द केलेलं अधिवेशन हे कितवं आश्चर्य”

अहमदनगर | राज्यात सरकारन दोन दिवसांचं हिवाळी अधिवेशन ठेवलं म्हणून विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारवर टीका केली होती. अशातच आता केंद्राने हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी भाजपवर टीका केली आहे.

राज्यात दोन दिवसांचे अधिवेशन घेणारे महाविकास आघाडी सरकार हे आठवं आश्चर्य असल्याची टीका भाजपचे नेते करतात. मग केंद्रातील अधिवेशन रद्द झाल्याचा निर्णय हे कितवं आश्चर्य आहे, हेही त्यांनी सांगाव, रोहित पवारांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने संसदेच हिवाळी अधिवेशन रद्द केलं आहे. तर याआधी राज्य सरकारने अधिवेशव दोन दिवसांचं ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा भाजपने आम्ही जनतेचे प्रश्न अवघ्या सात तासात कसे मांडायचे असा सवाल करत राज्य सरकारवरला धारेवर धरलं होतं.

दरम्यान, दोन दिवसाचं अधिवेशन काल संपलं आहे. रोहित पवारांच्या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

‘मी हाडाचा शेतकरी आहे’; वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करणाऱ्या दानवेंवर कडूंनी साधला निशाणा

‘हिंमत असेल तर भाजपने राष्ट्रगीत बदलून दाखवावं’; ममता बॅनर्जींचं भाजपला आव्हान

“कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलं”

….म्हणून मी हाडाचा शेतकरी आहे बनावट नाही- रावसाहेब दानवे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या