Top News महाराष्ट्र मुंबई

‘महाराष्ट्र भाजप रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलंय की’; रोहित पवारांची भाजपवर खोचक टीका

मुंबई | कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाला महिना उलटूनही सरकार तोडगा काढू न शकल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केला आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांच्या विधानांमध्ये एकमत नसल्याचं म्हणत, महाराष्ट्र भाजप तर रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलंय की आपण काय बोलून जातो याचंही त्यांना भान राहत नाही, असं पवार म्हणाले.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं अस्तित्व संपणार नाही, असं केंद्र सरकार म्हणतं आहे आणि दुसरीकडं कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड महाराष्ट्र भाजपचे नेते करतात, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करत नसल्याचा निराधार आरोप विरोधी पक्ष नेहमी करत असतो. याबाबत बघितलं तर गेल्या पाच वर्षात मागील सरकारने शेतकऱ्यांना जवळपास 53 हजार कोटींची मदत केली होती तर महाविकास आघाडी सरकारने अवघ्या एका वर्षात शेतकऱ्यांना जवळपास 37 हजार कोटीची मदत केली असल्याचं पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये’; या काँग्रेस नेत्यानं संजय राऊतांना फटकारलं

‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणजे काय?; जाणून घ्या या नावामागील कारण…

“संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करतायत”

मुंबईत मोठं सेक्स रॅकेट उघडकीस; अभिनेत्रीचा सहभाग आढळल्याने खळबळ

अ‍ॅमेझॉनला दणका दिल्यानंतर मनसेने पश्चिम रेल्वेला दिला हा इशारा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या