बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नव्या बदलासह नवी ‘Royal Enfield’ लवकरच भारतीय बाजारात धडकणार

मुंबई | तरूणांमध्ये गाड्यांची सर्वात जास्त क्रेझ असतं. राॅयल इनफिल्डला दुचाकी गाड्यांच्या दुनियेतलं बादशाह समजलं जातं. हार्डली डेविलस्न आणि राॅयल इनफिल्ड या दोन गाडयांमध्ये नेहमी चढाओढ असते. मागील काही काळापासून या गाड्यासांठी ग्राहकांची मोठी मागणी देखील वाढलेली दिसत आहे. त्यामुळे कंपनी राॅयल इनफिल्डला आता एका नव्या लुकसह बाजारात उतरवणार आहे.

कंपनी नवीन राॅयल इनफिल्ड इंटरसेप्ट 650 आता भारतीय बाजारात आणणार आहे. यासाठी कंपनीने बुकींग सुद्धा चालू केलं आहे. राॅयल इनफिल्ड कंपनी लवकरच भारतात आणखी एक नवीन सिरीज भारतात लाँच करणार आहे. यामध्ये क्लासिक 350 चे पुढील व्हर्जन तर नवीन 650सीसी क्रुझरचा समावेश असणार आहे. तर येत्या काळात या गाड्या इलेक्ट्रिक पर्यायासह उपलब्ध केल्या जाणार आहे.

राॅयल इनफिल्ड इंटरसेप्ट 650 मध्ये ग्राहकांना दोन नवीन सिंगल टोन पेंटचा ऑप्शन भेटणार आहे. कॅनन रेड आणि वेंचुरा ब्लु अशा दोन पेंटचा ऑप्शन असेल. तर या आधी गाडी ऑरेज क्रश आणि बेकर एक्सप्रेस रंगात उपलब्ध होती. या गाडीचा क्रोम पर्याय मध्ये कंपनीने बदल केले आहे. तर मार्क थ्री आणि सिल्वर स्पेक्टर कलर बंद करण्यात येणार आहेत.

दरम्यान, राॅयल इनफिल्ड इंटरसेप्ट 650 च्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात 648 सीसीची पॅरेलल ट्विन मोटर देण्यात येणार आहे. जी 47.65 पीएस पाॅवर आणि 52 एनएम पीक टाॅर्क जनरेट करते. यासारख्या नवीन फिचर्समुळे गाडी आणखी आकर्षक झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

15 वर्षाच्या लेकीने सख्ख्या आईची गळा चिरून केली हत्या; कारण ऐकून सुन्न व्हाल

काँग्रेसला धक्का! ‘हा’ माजी आमदार लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार

अन् पती पत्नीनं रचला इतिहास; राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच जुळून आला ‘असा’ योग!

नवनीत राणांची बाजू घेत सरकारवर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांना चाकणकरांनी सुनावलं, म्हणाल्या…

मुलगी दिली नाही म्हणून त्याने मुलीच्या आईलाच फूस लावून पळवलं, अन्…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More