महाराष्ट्र मुंबई

“ड्रग माफियांची माहिती न देताच ड्रामा क्वीन का परत गेली?”

मुंबई | ड्रग माफियांची माहिती न देताच ‘ड्रामा क्वीन’ का परत गेली?,असा सवाल विचारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अभिनेत्री कंगणा राणावतवर निशाणा साधला.

ड्रामेबाज नटी मुंबईत येण्याआधी फारच फुशारक्या मारत होती. बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शन संदर्भात आपल्याकडे माहिती आहे, असेही ती तावातावाने सांगत होती. महाराष्ट्र सरकारला आव्हान देण्याची भाषा करत मुंबईत येऊन या नटीने तमाशाही केला. पण ड्रग संदर्भातील कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच परत का गेली, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

या सर्व प्रकरणातून कंगणा ही भाजपची कठपुतली असून महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या कटाचा ती भाग आहे, हे आता स्पष्ट झालं, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला.

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघड होताच एनसीबी याप्रकरणी चौकशी करत होती, त्यांच्याकडे कंगनाने ड्रग संदर्भातील माहिती देणे उचित होते. पण या नटीने कसलाही संदर्भ नसताना मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली. मुंबई पोलीस याचा त्यावेळी तपास करत नव्हते. कंगनाकडे बॉलिवूड व ड्रग कनेक्शनची जी माहिती आहे ती तिने एनसीबीकडे द्यावी, अशी आम्ही मागणीही केली होती. पण मुंबईत काही दिवस राहून कंगनाने ही माहिती दिली नाही, हे आश्चर्यकारक असल्याचं सावंत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

विधी’च्या चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचं पुनर्विलोकन करा- सुनील गव्हाणे

अचानक अभिषेक फासावर लटकल्याचा दिसला तर…’; कंगणा राणावतचं जया बच्चन यांना प्रत्युत्तरव्या

पाऱ्याला मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या- शरद पवार

जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’; जया बच्चन यांचा रवि किशन यांना अप्रत्यक्ष टोलाका

काळठीण आहे फोन बंद ठेवू नका, 3 वाजताही कुणी फोन केला तरी उचला- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या