सॅमसंगचा नवा स्मार्टफोन; कॅमेराच्या ‘या’ नव्या फिचर्स सोबत बरंच काही….
मुंबई | सॅमसंग ने आपल्या गॅलेक्सी A सीरिजमधील एक नवीन स्मार्टफोन लवकरचं बाजारात येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी A32 असं या मोबाईलचं नाव आहे. हा मोबाईल 4G असून या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये कंपनीने फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. या मोबाईलमध्ये एकूण पाच कॅमेरे आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी A32 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा AMOLED इनफिनिटी-U नाॅच डिस्प्ले असून डिव्हाइसमध्ये इन-डिस्प्ले फिंंगरप्रिंट स्कॅनरही आहे. याशिवाय मागील बाजूला क्वाॅड रिअर कॅमेरा सेटअप असून त्यात 64MP चा प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड अॅंगल लेन्स, 5MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूला 20MP सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.
हा फोन 4 जीबी, 6 जीबी, 8 जीबी रॅम व 64 जीबी, 128 जीबी इंटर्नल स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. कंपनीकडून प्रोसेरबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन Awesome ब्लॅक, व्हाइट, ब्लू आणि व्हॅायलेट अशा चार रंगात उपलब्ध असेल.
दरम्यान, सॅमसंगने या फोनची किंमत किती असेल किंवा कधीपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल याबाबत, अद्याप माहिती दिलेली नाही. पण सॅमसंग गॅलेक्सी A32 4G या फोनच्या 5G व्हेरिअंटपेक्षा 4G व्हेरिअंटची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये फोनच्या 5G व्हेरिअंटची किंमत भारतीय चलनानुसार जवळपास 33 हजार 400 रुपये आहे.
थोडक्यात बातम्या –
पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
‘ये बंगाल की प्रमुख जनता है और….’; भाजपमध्येही होत आहे ‘पावरी’, पाहा व्हिडीओ
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री आणि शरद पवारांकडून अपेक्षा – विनोद तावडे
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात पूजाच्या आईचा अरूण राठोडबाबत धक्कादायक खुलासा; म्हणाल्या…
‘थंडीने गॅसचा दर वाढले’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब दावा
Comments are closed.