पुणे | महाविकास आघाडीच्या सरकारच्या अखेर काल एक महिन्याच्या अवधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिवसेनेच्या13 आणि राष्ट्रवादीच्या13 आमदारांसह काँग्रेसच्या 10 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच भोरमधील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी मंत्रिपद न दिल्यानं त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
संग्राम थोपटेंच्या समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनाची तोडफोड केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात थोपटे समर्थक घोषणाबाजी देखील करत होते. प्रदेशाध्यक्षांकडून थोपटेंना मंत्रिपद देण्याची आशा दाखवण्यात आल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे.
संग्राम थोपटे यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही म्हणून भोरमधील काँग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवक राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात मोदी लाट असतानाही पुणे जिल्ह्यातून एकमेव आमदार म्हणून निवडून आले होते.
दरम्यान, संग्राम थोपटेंनी पक्षाशी एकनिष्ठ राहूून काम केलं. त्यांनी तालुक्याचा विकास केला. त्यांना मंत्रिपदाची फक्त आशा लावून ठेवली मात्र प्रत्यक्षात त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आलं असल्याची भावना समर्थकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. थोपटे समर्थकांचा आक्रमकपणा पाहून थोपटेंना मंत्रिपद मिळणार की नाही?, हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांच्या आदेशानंतर मी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला- प्रकाश सोळंके – https://t.co/NcA1HdKslH @prakashsolnke @SahebEkVichar @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) December 31, 2019
अहमदनगर जिल्हा परिषदेवरची विखेंची सत्ता संपुष्टात! – https://t.co/dcv05cIO0z @RVikhePatil @BJP4Maharashtra @ShivSena @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) December 31, 2019
“महाविकास आघाडीचे सरकार कर्माने कोसळेल,100% महायुतीचं सरकार पुन्हा येईल” – https://t.co/d8Zvmfr0Qb @vinayak_mete @BJP4Maharashtra @NCPspeaks @INCMaharashtra #म
— थोडक्यात (@thodkyaat) December 31, 2019
Comments are closed.