मुंबई | शिवसेना खासदार आणि शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली आहे. यावर संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया देताना ट्विट केलं आहे.
आ देखे जरा किसमे, कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया…, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊतांनी गाण्याच्या ओळी शेअर करत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.
येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश संजय राऊतांच्या पत्नीला देण्यात आले आहेत. कलम 67 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती आहे
दरम्यान, गेल्या दोन दिवसात महाविकास आघाजडीच्या दोन नेत्यांना ‘ईडी’च्या नोटीस आल्या आहेत. राऊतांच्या या ट्विटमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 27, 2020
थोडक्यात बातम्या-
कोरोना हा महासाथीचा शेवटचा आजार नाही- WHO
कुणीही ‘मायचा लाल’ शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही- राजनाथ सिंह
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस
‘गो कोरोना गो’ नंतर रामदास आठवलेंनी तयार केलं नवं स्लोगन!
“राज्य सरकारने संभाजी भिडेंना अटक करावी?”