Top News महाराष्ट्र मुंबई

“पॉपस्टार रिहानाने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने काहींना मिरच्या झोंबल्या”

मुंबई | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पॉपस्टार रिहानाने पाठिंबा दिल्यावरून भारतीय सेलिब्रिटींनी केलेले ट्विट यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

पॉपस्टार रिहानाने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिल्याने येथील अनेकांना मिरच्या झोंबल्या. परदेशातील लोकांनी कलाकारांचं कौतुक केलेलं चालतं पण लढणाऱ्या शेतकऱ्याचं कौतुक केलं हा आपल्या देशातील हस्तक्षेप वाटतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

रिहानाच्या समर्थनार्थ जे आता उभे राहतील त्यांना ‘देशद्रोही’ ठरवलं जाईल. देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात कमालीचा स्वस्त झाला आहे. पण गाझीपूरच्या सीमेवर प्रत्येक तंबूवर तिरंगा फडकत आहे. देशभक्तीची गाणी लागली आहेत. सरकारच्या पगडीलाच शेतकऱ्यांनी हात घातला म्हणजे त्यांनी देशद्रोहच केल्याचं म्हणत राऊतांनी केंद्र सरकावर टीका केली आहे.

दरम्यान, लाल किल्ल्यावरील घटनेनंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. गाझीपूर सीमेवरील 235 तरुण बेपत्ता आहेत. त्यातल्या 140 जणांचा शोध आता तिहार तुरुंगात लागला. उरलेले आजही बेपत्ता आहेत. पोलिसांनी त्यांचे नेमके काय केलं?, असा सवालही अग्रलेखातून केला आहे.

थोडक्यात बातम्या-

धावत्या ट्रेनमध्ये या मराठी अभिनेत्रीने छैया छैया गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हिडीओ

‘बिग बॅास’ शो अर्धवट सोडल्यास स्पर्धकाला चुकवावी लागते ‘एवढी’ किंमत

“भाजपबरोबर जाण्यासाठी राज ठाकरे तयार आहेत म्हणून…”

…तोपर्यंत देश आत्मनिर्भर होणार नाही- नितीन गडकरी

“उतणार नाही मातणार नाही, तुम्हाला दिलेला शब्द कधीही खाली पडू देणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या