बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाॅलिवूडला मोठा धक्का! ‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन

मुंबई | ‘बिग बाॅस 13’ या रिअॅलिटी शोचा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिद्धार्थचे वय 40 वर्ष असून त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली आहे. सिद्धार्थ शुक्ला बिग बाॅसनंतर लोकांच्या प्रचंड पसंतीस आला होता. तसेच त्याची आणि अभिनेत्री शेहनाज गिलची जोडी देखील लोकांच्या मोठ्या पसंतील आली होती.

सिद्धार्थला अचानक ह्रदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. झोपण्याआधी सिद्धार्थने काही औषध देखील घेतली होती. मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बिग बॉसचा सीझन 13 हा आतापर्यंतचा सर्वांत हिट व सर्वात जास्त काळ चालणारा सीझन ठरला. या कार्यक्रमाने आतापर्यंतचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले. सिद्धार्थ सर्वात जास्त लोकांच्या नजरेस ‘बालिका वधू’ या मालिकेतून आला होता. त्यानंतर ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ या सिरीजच्या तिसऱ्या सिझनमध्ये तो झळकला होता.

दरम्यान, सिद्धार्थ हा कायम लोकांच्या चर्चेत होता. तसेच शेहनाज गिल आणि त्याची जोडीने लोकांना प्रचंड भुरळ घातली. मात्र, सिद्धार्थच्या अकाळी मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील आकडा चिंता वाढवणारा; आयसीएमआरचा महाराष्ट्राला गंभीर इशारा

ॲमिटी मुंबई विद्यापीठात ऑनलाईन शिक्षणाचं बिगुल वाजलं

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच भारतीय तालिबानी”

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक

पावसाने मोडला 12 वर्षांचा रेकाॅर्ड! 24 तासात तब्बल ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More